यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
आज दि.२ डिसेंबर रोजी यावलच्या खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात सरपंच परिषद या संघटनेची पहीली मासिक बैठक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
गावपातळीवर लोकहिताचे विविध विकास कार्य करीत असतांना सरपंचांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी लोकप्रतिनिधींच्या पाठीशी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ‘सरपंच परिषद’ ही संघटना सक्षम पाठबळ म्हणून उभी राहणार असून सरपंचांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे सोडविण्यासाठी व सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न संघटना करणार असल्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांकडून परिषदच्या वतीने देण्यात आले.
या प्रसंगी सरपंच परिषदचे जिल्हा समन्वयक युवराज पाटील, बाळु धुमाळ, श्रीकांत पाटील यांच्यासह जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे शेखर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी यांच्यासह तालुक्यातील सरपंच परिषदच्या उपाध्यक्षा तथा मोहराळा सरपंच सौ नंदा महाजन, महेलखेडीच्या सरपंच शरीफा तडवी, बामणोदचे सरपंच राहुल तायडे, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, बोरखेडा सरपंच राजेश तळेले, मारूळ सरपंच तथा सरपंच परिषदचे उपाध्यक्ष सैय्यद असद जावेद अली, पिंपरूडचे सरपंच योगेश कोळी, अंजाळे सरपंच यशवंत सपकाळे, अट्रावलचे सरपंच मोहन बाविस्कर, रिधुरीचे सरपंच नंदकिशोर सोनवणे, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, किनगाव बु.चे सरपंच भूषण पाटील, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, कोरपावली उपसरपंच हमिदाबी पिरन पटेल, भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, पिप्रि सरपंच मोहन कोळी ,विकास सोळंके सरपंच कोळन्हावी ,कोळवदचे सरपंच याकुब तडवी यांच्यासह तालुक्यातील सुमारे ५० सरपंच ३४ उपसरपंच आणि २०० ग्रामपंचायत सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर सोनवणे , शेखर पाटील, युवराज पाटील, बाळु धुमाळ, श्रीकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत. बैठकीची प्रस्तावना व उपस्थितांचे परिचय संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी केले. सुत्रसंचलन संजय पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार पाडळसा येथील सरपंच खेमचंद कोळी यांनी मानले .