Home Breaking News बनावट कागदपत्र तयार करून मनुदेवी संस्थानची फसवणूक; बाबा महाहंस महाराज यांच्यावर गुन्हा

बनावट कागदपत्र तयार करून मनुदेवी संस्थानची फसवणूक; बाबा महाहंस महाराज यांच्यावर गुन्हा

1310

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून नवीन ट्रस्टच्या नावाने जागा हडप करून संस्थानची फसवणूक करणाऱ्या बाबा महाहंस महाराज याला शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी अटक केली असून यावल पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील (वय-६२) रा. आडगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश मार्तंड पाटील उर्फ श्री बाबा महाहंस जी महाराज रा. आडगाव ता. यावल यांनी सातपुडा निवासीनी श्री. मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठान ही जागा वनविभागा कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. परंतू बाबा महाहंस यांना जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांना अटक केली आहे.

मनूदेवी संस्थानचे सचिव निळकंठ डिगंबर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वनविभागाच्या मालकीची जागा १९९१ पासून ही सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या मंदीराच्या विकासासाठी ही ०.२४ आर जागा वनविभागाने दिली होती. याबाबत सर्व पुरावे व नोंदणी संदर्भात कागदपत्रे संस्थाकडे आहे. असे असतांना संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट नावाने संस्था स्थापन करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केली असल्याचे सांगितले.

Previous articleकंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू
Next article९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी , त्या कुत्र्याला का केली अटक..