Home बुलढाणा रक्तदान केल्या शिवाय वाढदिवस साजरा झाला असे वाटत नाही.- अभयसिंह

रक्तदान केल्या शिवाय वाढदिवस साजरा झाला असे वाटत नाही.- अभयसिंह

380

 

मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ०५ डिसेंबर ला खामगाव उपजिल्हा रुग्णालयात न चुकता रक्तदान करतच असतो.मात्र यावर्षी ०५ डिसेंबर ला रविवार आल्याने व मधातच काही कामे निघत गेल्याने माझं यावर्षीच रक्तदान राहूनच गेलं होते. आणि रक्तदान नाही तर केलं तर वाढदिवस साजरा केल्या सारख वाटत नाही.
म्हणूनच मी आज आज सर्व काम बाजूला सारून खामगाव येथिल उपजिल्हा रुग्णालयात माझे ६५ वे रक्तदान केलं. तेथील रक्तपेढी विभागांतील पाटील मॅडम ,देशमुख मॅडम व इतरही सर्वांशी दिलखुलास चर्चा करता आली.मग रक्तदान करतांनाच तेथे नांदुरा येथील कुणाल वाघोडे हा युवक पण रक्तदान करतांना दिसला आणखी काही बरीच तरुण मंडळी येथे भेटली.त्यांच्या सोबत रक्तदान हीच खरी देशभक्ती आहे यावर बऱ्याच गप्पा मारल्या. तरुणाचं रक्त राजकारणात धर्म जातीच्या दंगलीत सांडल्या पेक्षा किंवा भरधाव वेगाने मोटरसायकल(बापाच्या पैशाच्या)च्या एक्सीडेंट मध्यें रोडवर सांडल्या पेक्षा ते रक्त दान करून आपण जाती धर्माच्या भिंती नक्कीच तोडून हा देश एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून उभा करू शकतो असे सांगून त्यांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले.
मित्रांनो रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक महत्वाच दान आहे.आणि तसेही खामगाव उपजिल्हा रुग्णालयात “o”+ve, “B”+ve रक्त अगदी नसल्या सारखेच आहे.शक्य झाल्यास त्यांना कशी मदत करता येईल यावर पण लक्ष द्यावे.

इन्कलाब जिंदाबाद

अभयसिंह
9423761908

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Next articleचेन्नई आज कुन्नुर परिसरात झालेल्या हेलीकॉप्टर अपघातामध्ये हेलीकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू