Home जळगाव सावखेडासिम येथे पशुवैद्यकीय विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग लसीकरण...

सावखेडासिम येथे पशुवैद्यकीय विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग लसीकरण शिबिर आज उत्साहात संपन्न झाला.

498

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

 


तालुक्यातील सावखेडासिम येथे आज पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी , पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे ,पंचायत समितीचे कॉंग्रेस गटनेते व संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सिमच्या सरपंच बेबीताई विकास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती यावल व प . वै . श्रे१ दहिगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग लसीकरण व सर्व चिकीत्सा शिबीर आयोजीत करण्यात आले होते . सदरच्या शिबीरात गुराढोरांना लसीकरण , जंत निर्मुलन, गोचिड निर्मुलन, खच्चीकरण , गर्भतपासणी, वंध्यत्व तपासणी व इतर उपचार आणि तपासणी करण्यात आली . शिबीरात डॉ. एस एन बढे , डॉ प्रविण कोळंबे , डॉ .आर सी भगुरे, डॉ. सि. एन. पाटील , वाय. जी. नेवे, डी. एस. निकम, नंददीप पाटील , मेहरबान तडवी आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वेसाठी विकास पाटील , विनोद पाटील , मिलींद भोगे व सावखेडासिम ग्रामपंचायत उपसरपंच व सर्वसन्मानिय सदस्य आदींनी परिश्रम घेतले .

Previous articleमोबाइल चे चाइनीज खेळा पासुन दूर राहने करता विरावली गावतिल श्रीराम ग्रुप मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Next articleचितोडा गावाजवळ मोटर सायकलला मालवाहू ॲपे रिक्षाची धडक .