Home Breaking News वेकोलि वणी परिसरातील घुग्घुस खदान संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर अपघात

वेकोलि वणी परिसरातील घुग्घुस खदान संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर अपघात

248

 

ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

झाल्याची घटना घडली, जखमीला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
एमएच 34-5080 या ट्रॅक्टरला 18 चाकी ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 9362 ने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रूपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी कॉंग्रेस नेते राजूरेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर व भाजप नेते विवेक बोढे घटनास्थळी दाखल झाले.

Previous articleचितोडा गावाजवळ मोटर सायकलला मालवाहू ॲपे रिक्षाची धडक .
Next articleशिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी दिला पक्षाला दिला जोरदार धक्का