Home Breaking News अमली पदार्थ युवा पिढीचे भविष्य खराब

अमली पदार्थ युवा पिढीचे भविष्य खराब

232

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो.9921400542

खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे लोकसभेत अंमली पदार्थ नियंत्रण व वापर नियमन कायद्याला समर्थन*
*शाळकरी मुले,महाविद्यालयीन विदयार्थी विद्यर्थिनी,सामान्य घरातील तरुण मुले मुली रेव्ह पार्ट्या, ड्रग्स,गांजा,अफीम,चरस, गुटका यासारख्या अंमली पदार्थांचे आहारी जाऊन स्वतःचे भविष्य उध्वस्त करीत असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ होत असून,देश व राज्यातील पुढची पिढी दिशाहीन होत असून चुकीच्यां मार्गाने भरकटत असल्याने याला कठोर उपाययोजना घालून आळा घालणे गरजेचे-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे लोकसभेत प्रतिपादन*
महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही मोठ्या प्रमाणात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे सांगून या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या व तरुण पिढीला व्यसनाधीन करणाऱ्या अवैध धंद्यांना ताबडतोब बंद करणे गरजेचे असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचा अन्न व औषधी प्रशासन विभाग,पोलीस विभागाने या संदर्भात कठोर पाऊले उचलून पायबंद घालणे गरजेचे असल्याचे मत खासदार सौ नवनित रवी राणा यांनी लोकसभेत व्यक्त केले.
मुंबई,दिल्ली यासारख्या अनेक महानगरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात असून ,मुंबईतील चित्रपट सृष्टी(बॉलिवूड)सुद्धा यात भरडल्या जात आहे,*आपला देश हा संस्काराचा व महापुरुषांच्या विचारांचा असल्याचे सांगून अश्या घटनांमुळे देशाची संस्कृती धोक्यात येत असून अख्खी पिढी बरबाद होत आहे असे मत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी अतिशय चिंतेने व्यक्त केले*
नशा ही माणसाला आरोग्यदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या कमजोर बनविते,मानवाची विचारशक्ती कमी होते व मेंदूवरचा ताबा सुटून व्यक्ती हा भरकटू शकतो ज्यामुळे या देशाच्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो व कुटुंबे उध्वस्त होऊ शकतात म्हणुन युवकांना नशेच्या दलदलीत फसविणाऱ्याविरुद्ध कडक पाऊलं उचलून त्यांना कठोर शासन होणे अत्यावश्यक असून ड्रग्ज,गांजा,चरस,अफीम, हेरॉईन,दारू,गुटखा या सारख्या अंमली पदार्थांचे आहारी तरुण पिढी जाऊ नये यासाठी कठोर कायद्यासोबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी स्पष्टपणे लोकसभेत मांडले.

Previous articleवर्ध्यातील तळेगांव आरओ प्लांटवरून भाजप कॉंग्रेस कार्यकर्ते एकमेकांत भिडले
Next articleअर्जुन नगर व मांगीलाल प्लॉट भागात २०.३५ लक्ष निधीतील रस्त्याचे लोकार्पण