Home Breaking News यावल तालुक्यात खुलेआम सार्वजनिक ठीकाणी घातक रसायन मिश्रीत पन्नीच्या दारूची विक्री उत्पादन...

यावल तालुक्यात खुलेआम सार्वजनिक ठीकाणी घातक रसायन मिश्रीत पन्नीच्या दारूची विक्री उत्पादन शुल्क विभाग लक्ष देइल का

823

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात सर्वत्र मानवी जिवनास अत्यंत धोकादायक पन्नीची दारूची खुलेआम विक्री अल्पवयीन मुलापासुन तर तरुणापर्यंत पहोचला आहे व्यसनाचा खेळ अनेकांचे कुटुंब उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असुन शिवाय अशा प्रकारे मिळणाऱ्या दारूमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुलीकर बुडीत निघत असुन , राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे होणाऱ्या अवैध दारूच्या विक्री कार्यवाही करावी अशी मागणी मोठया प्रमाणावर महीला वर्गाकडुन करण्यात येत आहे.

यावल तालुक्यात मागील अनेक दिवसांपासुन प्राण्यांवर वापरण्यात येणारी ऑक्सीटॉसीन इंजेकशन , बॅटरीत वापरण्यात येणारी सेल व आदीअशा प्रकारच्या अत्यंत घातक रसायनाव्दारे तयार होत असलेली दारू ही पन्नी च्या पाऊच मध्ये गल्ली बोळापासुन तर सर्वत्र शाळा परिसरापासुन तर सार्वजनिक ठिकाणी १०ते २० रुपयापर्यंत राजरोसपणे विक्रीला जात असल्याने दारूच्या आहारी जावुन शाळकरी अल्पवयीन मुलांपासुन तर तरूण वर्ग, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदर र्निवाह करणारे मजुरवर्ग व्यसनाधीन होवुन किडनी , लिव्हर आणी ह्दयला धोका होवुन मृत्युच्या सापळ्यात अडकत आहे . अशा प्रकारेमुळे अनेक तरूणांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन संपुर्ण कुटुंब उद्धवस्त होत असल्याची भयावह करणारी ह्वदयविदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली असुन, कुणालाही न घाबरता बिनधास्तपणे विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारू विक्रीला कुणाचा आशीर्वाद आहे याची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करून खुलेआम विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारूला हदपार करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

Previous articleरिधोरी ग्रामपंचायतच्या महीला समस्या दुर्लक्षीत कारभाराची गटविकास अधिकारी यांच्याकडे महीलांनी केली वंचीत आघाडीसह लिखित तक्रार
Next articleदुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ कार्यकारिणी जाहीर…! राज्य सहसचिव म्हणून निळकंठ शिंदे तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठल होंडे तसेच नाशिक विभाग प्रमुख म्हणून सतिश खाटेकर यांची निवड.