डी.एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी
आज निलंगा येथेअखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातील विज तोडणीविरुद्ध महावितरण कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी
शेतकऱ्यांसह प्रदेश अध्यक्ष मा.विजयकुमार घाडगे पाटील,राज्य सल्लागार मा.भगवान दादा माकणे, संपर्क प्रमुख मा.प्रकाश भाऊ गोमसाळे पाटील, तालुका अध्यक्ष मा.दास सांळूकें, तालुका संघटक मा.किरण भैय्या पाटील, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मा.वैभव गोमसाळे व छावा संघटनेचे पदाधिकारी यांनी महावितरणकडुन होणाऱ्या विज तोडणी संदर्भात अधीकाऱ्यासोबंत चर्चा करुन सरकार व महावितरण प्रशासन यानां शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन विज तोडनी थांबवावी अन्यथा छावा संघटना आक्रमक पवित्रा घेऊन शेतकऱ्यानां न्याय देईल असा इशारा करत भव्यआंदोलन करण्यात आले.