(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : ख्रिश्चन समाजाचे प्रेषित येशु मसीह यांचा जन्मदिवस हा नाताळ म्हणून साजरा केला जातो.
नाताळ हा पवित्र उत्सव ख्रिस्ती बांधवातर्फे अत्यंत आनंदांत साजरा केल्या जातो.
या दिवशी ख्रिसमस “ट्री” ला आकर्षक रित्या सजविल्या जाते
समाजबांधव चर्च मध्ये एकत्रित होत प्रार्थना करतात एकमेकांना शुभेच्छा देतात.
आज नाताळच्या पवित्र दिनानिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व पदाधिकारी यांनी शहरातील विविध चर्चला भेट दिली केक कापून समाजबांधवाच्य आनंदात सहभाग घेतला याप्रसंगी रोशन दंतालवार, नुरुल सिद्दिकी, विशाल मादर, स्टीवन गुंडेटी,अलीम शेख,मोसीम शेख,सुकमार गुंडेटी, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,सुनील पाटील,आरिफ शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते