Home चंद्रपूर घुग्घुस भाजपातर्फे नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

घुग्घुस भाजपातर्फे नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

275

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार 25 डिसेंबर रोजी नाताळ निमित्त घुग्घुस भाजपातर्फे ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
घुग्घुस शहरातील अनेक चर्चला भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिश्चन धर्मात प्रभू येशू मसिह यांचा जन्मदिवस नाताळ हा उत्साहात साजरा केला जातो.
त्याअनुषंगाने घुग्घुस भाजपा पदाधिकाऱ्यांनी अनेक चर्चला भेट देऊन ख्रिस्ती बांधवासह केक कापून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
नाताळ निमित्त घुग्घुस शहरातील चर्च रोषणाईने सजविण्यात आले होते. ख्रिस्ती बांधवांनी चर्च मध्ये एकत्रित येऊन प्रार्थना केली व एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे नामदेव डाहुले, विनोद चौधरी, सिनू इसारप, साजन गोहने, नितीन काळे, सिनू कोत्तूर, अनिल मंत्रिवार, उपस्थित होते.

Previous articleजिल्हाधिकारी कार्यालय समोर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे  3 रा दिवशीही आमरण उपोषण,सुरुच
Next articleभव्य नागरी सत्कार