Home Breaking News संग्रमपूर नगरपंचायत साठी आज पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल नाही.

संग्रमपूर नगरपंचायत साठी आज पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल नाही.

263

संग्रामपूर(मुख्य  संपादक ) दि.१८/जानेवारी / २०२२ / रोजी होवू घातलेल्या नगरपंचायतचे ४ प्रभागासाठी दि.१८/जानेवारी २०२२ला निवडणूक होत असून आज दि.२९/डिसेंबर रोजी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही.परंतु कोण उमेदवारी दाखल करणार यासाठी काही उत्सुक उमेदवार व कार्यकर्ते पाहण्यासाठी तहसिल कार्यालयात चकरा मारतांना दिसून आलेत.
संग्रामपूर नगरपंचायत अंतर्गत १७प्रभाग असून १३ प्रभागाची दि.२१/डिसेंबर /२०२१ निवडणूक पार पडली आहे. आता सर्वसाधारण जागेसाठी ४ प्रभागाकरीता दि.१८/जानेवारी २०२२ला निवडणूक होत असून आज दि. २९/ डिसेंबर /२०२१ ते ३/जानेवारी २०२२ पर्यंत ४जागेसाठी नामांकन अर्ज भरण्याची मुदत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस होता.परंतु आज दि.२९ला एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज संग्रामपूर तहसिल कार्यालयात निवडणूक विभागाकडे दाखल केला नाही .अशी माहिती संग्रामपूर नगरपंचायतचे निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.
आज जरी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी कदाचित आज दि.३०/डिसेंबर रोजी कोण व किती नामांकन अर्ज दाखल करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.आज कोण उमेदवारी अर्ज दाखल करतयं यासाठी मात्र काही उत्सुक उमेदवार व काही कार्यकर्ते हे पाहण्यासाठी व आपल्या पॕनल प्रमुखाला माहिती देण्याकरीता तहसिल कार्यालयाकडे चकरा मारतांना दिसून आलेत.

Previous articleलोयडस मेंटल्स कंपनी विरोधात काँग्रेसचा 30 डिसेंबर रोजी निषेध मोर्चा
Next articleमराठवाड्याचे जालना जिल्ह्याचे सुपुत्र प्रशिक सम्राट जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा भारतीय संविधान राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित.