Home Breaking News संग्रामपूर नगरपंचायत ४प्रभाग निवडणुकी करीता आज गुरुवारला दुसऱ्या दिवशी एकही नामांकन अर्ज...

संग्रामपूर नगरपंचायत ४प्रभाग निवडणुकी करीता आज गुरुवारला दुसऱ्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल नाही.

847

 

संग्रामपूर नगरपंचायतचे ४ प्रभागासाठी दि.१८/जानेवारी २०२२ला निवडणूक होत असून आज गुरुवारला ३०/डिसेंबर रोजी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही.
संग्रामपूर नगरपंचायत अंतर्गत १७प्रभाग असून १३ प्रभागाची दि.२१/डिसेंबर /२०२१ निवडणूक पार पडली आहे. आता सर्वसाधारण जागेसाठी ४ प्रभागाकरीता दि.१८/जानेवारी २०२२ला निवडणूक होत असून दि. २९/ डिसेंबर /२०२१ ते ३/जानेवारी २०२२ पर्यंत ४जागेसाठी नामांकन अर्ज भरण्याची मुदत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज दुसरा दिवस असून एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही .अशी माहिती संग्रामपूर नगरपंचायतचे शरद कोल्हे याःचे कडून माहिती मिळाली आहे.
आज सुद्दा जरी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी कदाचित उद्या दि.३१/डिसेंबर रोजी कोण व किती नामांकन अर्ज दाखल करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.तसेच भाजप,महाविकास आघाडी ,प्रहार ,वंचित व अपक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल. याकरीता अजुनही उमेदवाराची चाचपणी सुरु असून विरोधकांना कोण टक्क देणार यामुळेच कदाचित उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर होत आहे.संग्रामपूर शहरात चर्चा होत आहे.

Previous articleजिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त संतापले प्रकल्पांच्या कामाला लागणार ब्रेक……..
Next articleसंग्रामपूरात थंडीचा कडाका, हुडहुडी भरली. थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार.