,संग्रामपूर (अनिलसिंग चव्हाण)ः- तालुक्यात
वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या 2ते3 दिवसांपासून तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊसआला नाही. ढगाळ वातावरणामुळे जवळपास थंडी गायबच झाली होती. मात्र आता वातावरणात बदल झाल्याने थंडीची लाट आल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान तापमानात देखील घट झाली आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी संग्रामपूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी शेकोट्यांचा आधार महिला व बालकांसह नागरिक घेत आहेत .आजही दिवसभर थंडी जाणवत होती.
पुढील आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अनेक जण थंडीत घराबाहेर पडणे देखील टाळत आहेत.डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तर गेल्या 4ते 5 पाच दिवसांपासून गुलाबी थंडीची चांगलीच चाहुल लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे शहरासह तालुक्यात सर्दी, खोकल्यासारखे आजार व व्हायरल इनफेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.सध्या थंडी वाढल्याने हरभरा, गहू या रब्बी पिकांना देखील फायदा होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत .पण धुक्यासारखे वातावरण राहिल्यास सर्वच पिकांना धोका आहे.