शेगाव. श्री क्षेत्र नागझरी तालुका शेगाव येथे दिनांक 1 जानेवारी 2022 नवीन वर्षानिमित्त रोटरी क्लब आकोला व दमानी नेत्र हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पंधरा वर्षे झाले दरवर्षी या ठिकाणी शिबिर घेत आहेत या शिबिरामध्ये शेकडो लोकांचे डोळे तपासून व मोतीबिंदूचे ऑपरेशन कमी खर्चा मध्ये करतात या शिबिरासाठी आजूबाजूचे गावचे लोक येत असतात यामध्ये बटवाडी तालुका बाळापूर सुद्धा या वर्षी लोक आले होते. असेल गौलखेड, टेंभुर्णा , हिंगणा वैजनाथ टाकळी नागझरी ,वरखेड ,जवळा, येथून सुद्धा लोक आले होते . यामध्ये गोरगरिबांची ऑपरेशन हे कमी खर्चा मध्ये करून दिले जाते. यासाठी रोटरी क्लबचे श्री जे. टी.कराळे साहेब दमानी नेत्र हॉस्पिटल चे अधीक्षक शुक्ला साहेब व त्यांची संपूर्ण टीम सुद्धा उपस्थित होती. तसेच खूप नागझरी चे सरपंच गणेश खरप जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अवकाळे सर शाळा सुधार समितीचे अध्यक्ष गुलाबराव कराळे उन्हारखेळ चे पोलीस पाटील गुलाबराव पाटील स्वस्त धान्य दुकानदार ईश्वर कराळे व सर्व गावातील नागरिक उपस्थित होते.