शहर काँग्रेसने घडविले माणूसकीचे दर्शन
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : नव वर्षाच्या पहिल्या दिवशीच घुग्घुस शहर काँग्रेसच्या
वतीने अमराई वॉर्डात राहणारा दीपक उईके हा होतकरू युवक घरचा एकमेव कमावता होता.
मात्र दुर्दैवी रीत्या अपघातात त्याला कायमचे अपंगत्व आले. ताठ मानाने चालणारा युवक असहाय झाला या युवकाला काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी तीन चाकी सायकल भेट स्वरूपात देत नव वर्षाची सुरुवात केली.
तसेच त्याला स्वयंम रोजगार ही निर्माण करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, बालकिशन कुळसंगे, विजय माटला,अंकुश सपाटे,आरिफ शेख,सुनील पाटील,रंजित राखुंडे,विजय रेड्डी, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.