Home Breaking News स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश जोहर नगरातील रस्त्याचे काम पूर्ण

स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश जोहर नगरातील रस्त्याचे काम पूर्ण

181

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

बुलडाणा : जोहर नगरातील सोफा मस्जिद समोरील रस्त्याचे काम स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर पूर्ण करण्यात आले . त्यामुळे स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश आले . प्रभाग क्र . २ मधील जोहर नगरातील सोफा मस्जिद समोरील रस्त्याच्या काँक्रीटीकरण रस्त्याचे काम तातडीने करावे या मागणीसाठी स्वाभिमानीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शे . रफिक शे . करीम व स्व . राणा चंदन यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले होते . अखेर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात होऊन ३१ डिसेंबरला काम पूर्ण करण्यात आले . रस्त्यासाठी रस्त्यावर बेशरमाचे झाड लावून आंदोलने केली व मात्र त्यामध्ये यश न आल्याने आंदोलनाचा ईशारा दिल्यावर सदरच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली . त्यामुळे आज रोजी रस्ता पूर्णत्वास आला आहे . सदरच्या रस्त्यासाठी निधी नगर पालिकेने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने न देता स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे निधीतून या रस्त्यासाठी निधी आनण्यात आला होता . त्यामुळे या भागातील नागरीकांनी स्वाभीमानी शेतकरी संघटने अभिनंदन करुन आभार व्यक्त £ केले .

Previous article२० वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या
Next articleपो.आर.पोटे अभियांत्रिका येथे विजेच्या धक्याने जागिच ठार!