Home अमरावती अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार-आ. बाळाराम पाटील

अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार-आ. बाळाराम पाटील

161

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका मो.9921400542

तळा-रायगड : कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार असल्याचा विश्वास दिला आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांचा तळा तालुका शिक्षक संवाद दौरा बोरघर हायस्कूल येथे दिनांक ७ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करणे, अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण मिळवून देणे, घोषित व अघोषित शाळेंचे प्रश्न मार्गी लावणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, पात्र, अपात्र शाळेंचे प्रश्न, प्राथमिक शाळा बंद न पडू देणे, ४० टक्के टप्प्यातील शाळेचे मागील वेतन अदा करणे, अंशतः अनुदानित शिक्षकांचे समायोजन करणे आदी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक रसाळ, शेतकरी कामगार पक्षाचे तळा तालुका सरचिटणीस श्री धनराज गायकवाड, निवृत्त प्राचार्य श्री आर के म्हात्रे, निवृत्त मुख्याध्यापक श्री बी पी म्हात्रे,पुरोगामी शिक्षक संघटनेचे युवाध्यक्ष देवा पाटील, श्री बबन म्हात्रे, श्री रा गो पाटील, बोरघर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, पत्रकार कृष्णा भोसले, तळा तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. विशेष भेट म्हणून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म. वेदक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजला भेट देऊन विविध समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेशशेठ देशमुख यांनी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक श्री धुमाळ सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleसहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाची गळफास घेवून आत्महत्या
Next articleग्रामपंचायत कार्यालय सूनगाव येथे पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न