Home बुलढाणा ग्रामपंचायत कार्यालय सूनगाव येथे पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत कार्यालय सूनगाव येथे पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न

253

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद जळगाव जा

तालुक्यातील ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन निमित्त सुनगाव येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष गुणवंतराव कपले जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे सरपंच रामेश्वर अंबडकार यांनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे सन्मान करीत त्यांना पेन व डायरी भेटवस्तू दिली यावेळी पत्रकार दिन का साजरा केल्या जातो याविषयी मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी अश्विन राजपूत यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली यावेळी सुनगाव येथील ज्येष्ठ पत्रकार राजकुमार भड शिवदास सोनोने गणेश भड अनिल भगत गजानन सोनटक्के गजानन खिरोडकार अश्विन राजपूत इत्यादी पत्रकार व सुंनगाव ग्रामपंचायत सदस्य विमलताई काळपांडे बळीराम धुळे व इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते

Previous articleअंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार-आ. बाळाराम पाटील
Next articleवन अधिकारी दिपकराव हिगणीकर सेवानीवृत्त अचलपूर,