Home बुलढाणा शेगावात  तहसीलदार, पोलीस व पालिका प्रशासन रस्त्यावर

शेगावात  तहसीलदार, पोलीस व पालिका प्रशासन रस्त्यावर

316

 

कोविड नियमाचे उल्लंघन करणार्या 54 जणाविरूध्द कारवाई 10 हजार 200 रू दंड वसुल

शेगाव : शहरात तहसीलदार, पोलीस व पालिका प्रशासन रस्त्यावर उतरले. कोविड नियंत्रणासाठी विना मास्क फिरणारे आणि कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 54 लोकांना 10200 दंड करण्यात आला आहे.

तहसीलदार समाधान सोनवणे यांचेसह पोलीस, पालिका अधिकारी शहरातील रस्त्यावर तसेच गर्दीचे ठिकाणी जावून कोविडचे नियंत्रणाबाबत जनजागृती केली.त्याचप्रमाणे नियमाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर दंडात्मक करवाई करण्यात आली.तहसिलदार , ठाणेदार शेगाव शहर , नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्त करवाई केली.

स्वतःची तसेच आपल्या परिवाराची सुरक्षा राखणे,आपआपले कर्तव्य आहे. कोविड नियंत्रणासाठी प्रत्येकानी जागरूक राहून नियम पाळले पाहिजे. स्वतः नियम पाळत दुसर्यानाही नियम सांगावे.आपली सुरक्षा आपल्या हातात आहे,असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे .

Previous articleमनमानी कारभाराने स्टेट बॅंकेचे ग्राहक त्रस्त.
Next articleविनापरवाना रेतीची वाहतूक करत असताना भोन येथे ट्रॅक्टर पकडले