SURYA MARATHI NEWS
अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक
तालुक्यातील भोन येथील नदीपात्रात विनापरवाना रेतिची वाहतूक करीत असताना विना नंबर क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडल्याची कारवाई मंडळ अधिकारी राऊत यांनी 10 जानेवारी रोजी केली
तालुक्यातील नदीपात्रात दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक सुरू आहे ही वाहतूक सुरू असताना 10 जानेवारी रोजी मंडळअधिकारी राऊत व तलाठी जगताप हे भोन येथे जात असताना त्यांना विना नंबरचे ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करत असताना निदर्शनास आले याबाबत वाहन चालकाला रेतीची वाहतूक करीत असल्याचा परवाना असल्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नव्हता त्यामुळे ट्रॅक्टर मालक नंदाबाई बळीराम काकड राहणार जानोरी तालुका शेगाव यांना अवैध रेती वाहतूक प्रकरणी 1लाख 22 हजार 100 रूपयाचा दंड ठोठावण्यात आला.या कारवाई मुळे रेतीची अवैध वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.