यावल ( कार्यकारी संपादक) विकी वानखेडे
तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनच्या वतीने आयोजीत आमरण उपोषण हे उपोषण कर्त्यांना लिखित आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे . कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार होते ,परंतु यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मध्यस्थीने व राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा करून जळगाव जिल्ह्यातील १० तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे मिळाले असून, याबाबत यावल तालुक्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले व आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी देखील या विषयात जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे . जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया कडून मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यासाठी सरासरी २ दिवस पाऊस झाल्याने जवळपास १६ कोटी रुपयांचे शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याने या संदर्भातील महसुल प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून , तहसील कार्यलय यावल जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखा यांना आज प्रशासनाच्या वतीने स्मरण पत्र पाठवले असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे लेखी आश्वासन नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांनी उपोषण सोडवले यावेळी वढोदे सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, पिंपरुडचे सरपंच योगेश कोळी,उमेश जावळे,शहराध्यक्ष नईमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस भूषण निंबायत, तलाठी मुकेश तायडे, कोतवाल धनराज महाजन, रामलाल कोळी,अकलुदचे ग्राप सदस्य अजय पाटील, सह शेतकरी उपस्थित होते.