Home लातूर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक.

202

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

भाजपा प्रदेश सचिव श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषद हे लोकांच्या समस्या सोडवण्याचे आणि विकासकामांचे एक उत्तम व्यासपीठ आहे आणि मतदारांनी या व्यासपीठावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे, सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.
निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, सदस्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदारसंघात नियमितपणे पोहोचण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. संपर्काच्या या काळात गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना देणे आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आवश्यक आहे.
राज्यात सत्ता नसताना आपले केलेले कार्य आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या जनहिताच्या कामासोबतच सर्वसामान्यांना झालेला फायदा हेच आगामी निवडणुकीत त्यांच्या निवडीचे रहस्य आहे. अधिकाधिक लोकांनी संपर्क मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

Previous articleजिल्हा परिषद सदस्या सविता ताई अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून गटात एक कोटी तीन लाख पन्नास हजार रुपयांचे निधी उपलब्ध
Next articleनाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य मुळे लोणार भा, ज, प, चे वतीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत ची तक्रार