Home Breaking News यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी IAS नेहा भोसले यांची नियुक्ती

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी IAS नेहा भोसले यांची नियुक्ती

4248

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदाचा पदभार स्विकारला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी निलेश पाटील यांची चार महिन्यापुर्वी नाशिक येथील कळवण येथे शासकीय बदली करण्यात आली होती. तेव्हा पासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते. तेव्हापासून सहाय्यक गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती केले आहे. मंगळवारी १८ जानेवारी रोजी नेहा भोसले यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचा पदभार सकाळी १० वाजता स्विकारला. नेहा भोसले ह्या आयएएस अधिकारी असून आगामी काळात शासकीय योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचे लक्ष गाठणे हे आपले प्रमुख लक्ष राहणारचे नेहा भोसले यांनी सांगितले.

Previous articleनाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य मुळे लोणार भा, ज, प, चे वतीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत ची तक्रार
Next articleकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी