काँग्रेसने केली आर्थिक मदद
(चंद्रपूर घुग्गूस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्गूस : येथील वॉर्ड क्रं. 02 येथे राहणाऱ्या मीना अजय आमटे ह्या अत्यंत हलाखीचे दिवस काढत असून उपजीविकेचे साधन म्हणून चहाची छोटीशी दुकान चालवितात त्यांना एक मुलगा असून तो मानसिक व शारीरिक रित्या कमकुवत आहे.
मुलगा घरी एकटा असतांना त्याने उजेडा करिता मेंणबत्ती पेटवली व घराच्या बाहेर गेला असता मेंणबत्तीने पेट घेतला व यात संपूर्ण घरच जळून राख झाला
आग एवढी भीषण होती की आगीत अन्न – धान्य, कपडे – लत्ते बिछाना सर्वच जळून गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
सदर घटनेची माहिती काँग्रेस महिला नेत्यां सौ. संगीता बोबडे यांनी तात्काळ शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांना दिली असता आज सकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
व पीडित कुटूंबाला अन्न – धान्य, साडी, व नगदी स्वरूपात मदद दिली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,ज्येष्ठ नेते किशोर बोबडे, सौ. संगीताताई बोबडे, कामगार नेते सैय्यद अनवर, विजय माटला, सुनील पाटील, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते