Home Breaking News रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर...

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर महिलेला वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्यास दिरंगाई -प्रांजली धोरण

247

 

मलकापूर :- रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर महिलेला वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्यास दिरंगाई का होत आहे असा सवाल करताच मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडून तांत्रिक कारण समोर करण्यात येऊन पीडितेच्या प्रस्तावावर तातडीने आजच कार्यवाही अशी हमी देण्यात आल्याने जाणीव फाउंडेशनचे प्रयत्न सार्थकी ठरल्याचे दिसून आले.
मलकापूर तालुक्यातील मौजे बेलाड येथील सुनिता अर्जुन संबारे यांचा प्रस्ताव दाखल होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरीही अद्याप पावेतो त्यांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक साहाय्य मिळाले नाही यासंदर्भात यापूर्वी तसेच १६ जानेवारी रोजी पुण्यनगरीने वृत्त प्रकाशित करून वास्तव परिस्थिती मांडली होती. या वृत्ताची दखल घेत जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा प्रांजली धोरण यांनी थेट मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडक देत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिरंगाईबाबत जाब विचारला. दरम्यान अमाऊंट रिफेलेक्ट होत असल्यामुळे वेळ लगत होता परंतु आज सदर मदतीची रक्कम पीडित महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन देत रक्कम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांत्रिक अडचण येत होती. त्यामुळे थोडा उशीर झाला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मान्य केले. दरम्यान प्रांजली धोरण यांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या इतर पीडित प्रस्ताव धारकांच्या बाबत सुद्धा माहिती मागितली असता सदर माहिती सुद्धा आपल्याला देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले. यावेळी जाणीव बहुद्देशीय फाउंडेशनचे नितीन गवई, मनोज यादव, सचिन ढोण, मंगेश तायडे, गणेश वाघ आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleउजड देणाऱ्या मेंणबत्तीनेच घराची केली राख- रांगोळी
Next articleवरिष्ठ पत्रकाराचां प्रयत्नाला यश घुग्घुस म्हातारदेवी रोडचे गड्डे बुजवले.