Home Breaking News दुचाकीवरून महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५००...

दुचाकीवरून महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा माल पसार

976

 

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

दुचाकीवरून महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार किनगाव रोडवर घडला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मनीषा विजय खंबायत (वय-३०) रा. किनगाव ता. यावल हल्ली मुक्काम उपनगर, नाशिक या महिला बुधवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी नंदोई भाऊ दिनेश दिगंबर लिंबायत यांच्यासोबत दुचाकीने किनगाव येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला लावलेल्या पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यात सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या रिंगा आणि रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पर्ससहित चोरून नेला आहे. याप्रकरणी मनीषा खंबायत यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या रात्री ८ वाजता यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजिज हमीद शेख करीत आहे.

Previous articleमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ*. येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न…….
Next articleचामोर्शीचे पथक पोहोचले शाळा बाह्य व स्थलांतरित कुटुंबातील पालकांच्या जथ्थ्यावर. शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.