अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू महाराष्ट्र आझाद हिंद संघटनेचा इशारा .
अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)
संग्रामपूरः- मोताळा तालुक्यातील सर्व आरा मशीन वरील माल व अवैध वृक्ष तोडीची पूर्ण चौकशी व्हावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र आजाद हिंद संघटनेच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ वर्षा गिरधर साथारकर यांनी आज दिनांक 19/ जानेवारी रोजी उपवनसंरक्षक वन विभाग बुलढाणा यांना निवेदन देऊन दिला आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की कंडारी , फुले रोड चांदुर बिस्वा रोड, व नांदुरा, मोताळा तालुक्यामध्ये विनापरवाना वृक्षतोड होत असून त्या मालाची सर्रास वाहतूक दोन्ही तालुक्यांमध्ये होत असून हा माल दोन्ही तालुक्यातील सर्व आरा मशीन वर माल विनापरवाना कटाईचा आहे. तरी आर एफ.ओ. यांनी जातीने लक्ष देऊन दोन्ही तालुक्यातील आरा मशीन वर जाऊन सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. याबाबत दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग मोताळा यांना अर्ज दिले. तरी सुद्धा अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तरी दोन्ही अर्जाचा विचार करून लवकरात लवकर कारवाई करावी .अन्यथा लोकशाही मार्गाने आला हिंद संघटनेच्यावतीने नांदुरा मोताळा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष वर्षा ताथरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.