शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे
शेगाव: एकीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण बापू देशमुख हे शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची बदली करण्याच्या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर 17 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत तर दुसरीकडे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या समर्थनार्थ शेगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून त्यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. शेगाव येथे नगरपालिकेचे मुख्य प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या पक्षपाती भूमिके विरुद्ध त्यांची शेगाव येथून तत्काळ बदली किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी शहर काँग्रेस अध्यक्षांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे तर शेगाव नगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने सुद्धा नगरपालिका प्रशासन प्रशांत शेळके यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेऊन नगरपालिकेतील लेडीज मोबाईल नंबर 62 अधिकारी-कर्मचारी व 80 सफाई कर्मचारी अशा एकूण 142 कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत शेळके यांची कोणत्याही परिस्थितीत शेगाव येथून बदली करण्यात येऊ नये या मागणीसाठी व त्यांच्या समर्थनार्थ आज 20 जानेवारी गुरुवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करून कशा प्रकारचे निवेदन पत्रसुद्धा बुलढाणा येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले.. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध नगरपालिका अशी लढत आगामी काळात शहरवासीयांना पाहावयास मिळेल अशी चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये कोण कोणावर भारी पडतो याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे