जगन मोरे लोणार प्रतिनिधि
लोणार शहरा मध्ये दिनांक २० जानेवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी एक ऑटोमोबाईल दुकान फोडत दुकानातील साडेतीन लाख रुपये वर डल्ला मारत इतर हॉटेल व विविध प्रतिष्ठान शहरातील तीन दुचाकी चोरून नेल्याची घटना पहाटे उघडीस आल्याने एकच खळबळउडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली जय कमळजा स्पेअर पार्ट चे दुकानाचे कुलूप व शटर वाकवून गल्यातील साडेतीन लाख रुपये व १२ हजार किमतीच्या डीव्हीआर चोरून नेला त्याचबरोबर बायपासवरील कपिल विजय खिवसरा यांचे हॉटेल फिस्टा फोडून गल्यातील नगदी ३२ हजार पाचशे रुपये व ९ हजार रुपये किमतीचा डी व्ही आर तसेच पटेल नगर मधील विजय उत्तमराव सानप यांची दुचाकी नंबर एम एच २८ ए जी ५२६५ किमती अंदाजे चाळीस हजार रुपयांची तसेच ओम प्रकाश मंगलदास मुवाल राहणार लोणार यांची हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए ७८१८ किमती पंचवीस हजार रुपये व स्टार सिटी कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए टी ८४८० किमती २० हजार रुपये अशा एकूण तीन मोटरसायकल ८५ हजार रुपयाच्या एकूण ०४,८२०००/ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दिनांक १९ जानेवारी रोजी रात्री आठ ते दिनांक २० जानेवारी सकाळ च्या दरम्यान चोरून नेले आहे पुढील तपास फिर्यादी पंकज वसंतराव मापारी यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक ४६१/३८०/३७९ भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे बीट जमादार रामकिसन गीते पो का जगदीश सानप करीत आहे यावेळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आर एच गाढवे तपासणीस पीएस वैद्य फोटोग्राफर एपी चित्ते स्वान पथकाचे गजानन राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत सूक्ष्म निरीक्षण करत महत्त्वाचे धागेदोरे जमा केले आहे.