शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे
शेगाव. मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला बांगड्या चढवल्या.
शेगाव. शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची बदली करावी म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण बाप्पू देशमुख यांनी गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शासन स्तरावर पाच दिवसातही काही निर्णय होत नसल्याचे बघून आता काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमकता दाखवीत या आंदोलनात उडी घेतली आहे शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांना भेटून त्यांचा निषेध करण्याची योजना महीला काँग्रेसने आखली होती डॉ प्रशांत शेळके यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसचे पथक नगरपालिकेत आले असता मुख्याधिकारी बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांना मिळाली आमच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानेच मुख्याधिकारी पळून गेल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला यानंतर कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला मुख्याधिकाऱ्यांच्या फोटो लावून त्यावर बांगड्या चढवल्या मुख्याधिकारी हाय हाय अशा घोषणाही यावेळी त्यांनी दिल्या. मुख्याधिकाऱ्याचा निषेध असो आदी घोषणांनी नगरपालिका परिसर दुमदुमून गेले होते महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सविता झाडोकार डॉक्टर शबनम शेख सुनीता कलोरे मीराताई माळी कविता राजवैद्य, स्नेहलता दाभाडे, लीना भारंबे,मिरा माळी, सुनिता कलोरे,लिना भारंबे, , माधुरी संतोष ठाकूर, आदी महिला कार्यकर्ता यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅमे-यासमोर आंदोलन करीत होत्या.