Home चंद्रपूर दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात साखळी उपोषणाचा सातवा दिवस

दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात साखळी उपोषणाचा सातवा दिवस

217

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 16 डिसेंबर पासून घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. सातव्या दिवशीही साखळी उपोषणा सुरु होते. घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात येत आहे. जोपर्यंत वार्ड क्र. 04 व 05 ला निधी मिळत नाही व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार असून दोन दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडा माजी सरपंच ऋषी कोवे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, भाजपाचे प्रवीण सोदारी, संतोष कोंडपेल्लीवार उपस्थित होते.

Previous articleप्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेंतर्गत रस्ते विकासासाठी ४८२.६३ लक्ष रुपये निधी..
Next articleशेख सज्जाद शेख करामत यांचा आॅल इंडिया जमीयतुल कुरैश च्या वतीने सत्कार करण्यात आला.