Home Breaking News विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार बिस्कीटच्या पुड्यात आढळली अळी, दोषीवर कारवाईची पालकाची मागणी..!

विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार बिस्कीटच्या पुड्यात आढळली अळी, दोषीवर कारवाईची पालकाची मागणी..!

550

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

संग्रामपूर तालुक्यातील पळशी (झाशी )येथील ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळालेल्या बिस्किट पुड्यात अळी आढळली याबाबत विजय विठ्ठल ठाकरे विद्यार्थ्यांच्या पालकाने संग्रमपूर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे दिनांक 22 जानेवारी रोजी माहिती देऊन तक्रार दिली,त्यावरून दुसऱ्या दिवशी दिनांक 23 /जानेवारी रोजी पळशी झाशी येथे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील विद्यार्थी अमोल विजय ठाकरे हा जिल्हा परिषद.हायस्कूल संग्रामपूर येथील ८ व्या वर्गात शिकत असून त्याला शालेय पोषण आहार योजनेचे बिस्टिक खाण्याकरता दिले, त्यामध्ये अळी आढळून आल्याची तक्रार विद्यार्थ्यांचे पालक विजय ठाकरे यांनी दिली असता दुसऱ्या दिवशी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पळशी झाःशी येथे जाऊन पंचनामा केला असता त्यामध्ये बिस्किट कोरलेली आढळून आले व त्यामध्ये अळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे .सदर बाबीचा पंचनामा करुन सिलबंद केले. या प्रकरणी संबंधितावर सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी पालक विजय ठाकरे यांनी केली आहे.

 

Previous articleपूर्णानगर येलकी पूर्णा येथिल रोड दूरस्ती करा! अली हेल्प ग्रूपची मागणी
Next articleनांदुरा येथे महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी.