संग्रामपूरः- ज्यांनी भारत स्वातंत्र्य होण्यासाठी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले.असे महान स्वातंत्र्य सेनानी व आझाद हिंद संघटनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती दि.२३/जानेवारी रोजी नांदुरा येथे रेल्वे स्टेशन चौकात कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच उपस्थितीत साध्या स्वरुपात साजरी करण्यात आली.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आझाद हिंद संघटना विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईदभाई होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.वर्षा ताथरकर ,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, अनिलसिंग चव्हाण होते. प्रथम रेल्वे स्टेशन चौकातील सुभाषचंद्र बोस यांचे अर्ध पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार घालून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थितीतांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर कु.वैष्णवी सुसर ह्या तरुण युवतीने क्रातीकारी सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनावर प्रकाशझोत टाकून त्यांचेजीवनपट बद्दल माहिती दिली.त्यानंतर जेष्ठ पत्रकार यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देश्याच्या स्वातंत्र्याची जगाला गवसणी घालण्याचे कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस.नेताजींच्या विचारात एक वेगळीच उर्जा व शक्ती होती.यापुळे अनेक देशप्रेमी तरुणांच्या मनात जोश निर्माण झाला तो केवळ भारतासाठीच नव्हे तरजगासाठी प्रेरणा स्थान होते.”तुम मुझे खून दो!मै तुम्हे आजादी दुंगाॕ ह्या घोषणेने भारतीयांच्या मनात त्यांनी राष्ट्र प्रेमाची ज्योत फडकावली.त्याप्रमाणे आपण किमान ज्यांचेवर अन्याय होतो व गुलामगिरी केल्या जाते अश्यांना न्याय द्यावा.असे सांगितले . तर अध्यक्षीय भाषणातून आझाद हिंद सेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद भाई यांनी एकजुटीने राहून संघर्ष करुन गरीबांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. ह्यावेळी आझाद हिंद सेना शेतकरी संटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष शे.मझरभाई, व नागरिक ,महिला पदाधिकारी प्रामुख्याने हजर होत्या.