Home Breaking News देशी दारूच्या नवीन दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा : काँग्रेस

देशी दारूच्या नवीन दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा : काँग्रेस

265

 

नगरपरिषदे विरोधात काँग्रेस छेळणार आंदोलन

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : जिल्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध कामगार नगरीत कामगारांचा मोठा भरणा आहे.
सात वर्षाच्या बंदी नंतर आता जिल्ह्यात रीतसर दारू विक्री शुरू झाल्याने शहरात देशी – विदेशी दारू धंद्याला उत आलेला आहे.
शहरात आधी पासून जवळपास सतरा वाईन बार व तीन देशी दारू भट्टी असतांना विलास भिकाजी टेंभूणे संचालक में.चिर्यस प्रा.लि.उल्हासनगर जि. ठाणा यांच्या स्थलांतरित दुकानास नगर परिषदेने परवानगी दिली असून
सदर दुकान हे घुग्गूस येथील आनंद वाईन बारच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येत आहे.
याठिकाणीच दहा ते पंधरा मीटर अंतरावर दिक्षा भूमी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक आहे.
व तीस मीटर अंतरावर माता माऊलीचे मंदिर आहे.
याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो याच परिसरात नागरिकांसाठी प्रस्तावित बगीचा व वीस फुट रस्ता आहे.
करिता सदर देशी दारूच्या विरोधात घुग्गूस शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता व गेल्या वर्षी आगस्ट महिन्यात दारू दुकानाला परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात आले होते.
असे असतांना ही सदर देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली सदर तातळीने रद्द करावी या करिता किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आले व परवानगी रद्द न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही काँग्रेसने दिला.
याप्रसंगी घुग्गूस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, प्रशांत सारोकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleनांदुरा येथे महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी.
Next articleराष्ट्रीय विषवगामी पत्रकार संघ लोणारच्या वतीने तहसीलदारांना निवेदन शहर प्रतिनिधी जगन मोरे लोणार