अर्जुन कराळे शेगांव
शेगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चींचखेड येथे कार्यरत श्री. प्रमोद इंगळे, तसेच जि. प. म. प्रा. शाळा टाकळी नागझरी येथे कार्यरत श्री डिगांबर काकड शिक्षक यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जि.परिषद उच्च प्राथमिक शाळा बोंडगाव येथे शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, पुरस्कार मिळाल्या बाबत विनोद डाबेराव केंद्रप्रमुख मनसगाव, सौ कात्रे मॅडम खातखेड, श्री. घुले सर, श्री.सोनटक्के सर ई. त्यांचे अभिनंदन केले ,
तर एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. विशेष मुलांचे शिक्षक याच भावनेतून मुलांना शिकवीत असल्याने श्री. काकड सर आणि श्री. प्रमोद इंगळे सरांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी सागर थारकर, आकाश थारकर, योगेश थारकर, सुभाष कळसकर,
नंदू घोराडे,अजय अंदूरकर, ऋतिक इलामे ई. उपस्थित होते.