(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.* संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. या प्रसंगी भारत साळवे व शंकर नागपुरे यांनी देशभक्तीपर गीत गायले.
याप्रसंगी सेवानिवृत्त माजी सैनिक राजेंद्र किनाके यांनी ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा,, नंदा कांबळे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, अर्चना मुळेवार, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, भाऊराव मोहजे, पुंडलिक खनके, जंजर्ला, वमशी महाकाली, आभार प्रदर्शन कुसुमताई सातपुते यांनी केले.