अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरातील टिळक स्मारक मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या या सोहळ्यात मेहकर तालुक्यातील कळपविहिर गावातील ओम गणेश तांगडे यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे असलेले सुप्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार, लेखक,वक्ता ह.भ.प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर सोबतच कार्यक्रमा चे अध्यक्ष मा.श्री.रमेश आव्हाड (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांनी ओम तांगडे यांच्या गळ्यात गौरव पदक घालून व तसेच मानाचा फेटा,मानकरी बॅच, महावस्त्र, सन्मानचिन्ह,आणि मानपत्र देऊन राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान केला. सदरील पुरस्कारा बद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर अभिनंदनाचा आणि शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
ओम तांगडे हे छात्रभारती विद्यार्थि संघटने च्या माध्यमातून समाज कार्य करीत असतात. छात्र भारती संघटना संपूर्ण महाराष्ट्रात अखंड पने कुढल्याही राजकीय पाठबळा शिवाय लढत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या अगोदर च ओम तांगडे ला तालुका अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिनाक्षीताई गवळी यांनी केले.तर गुनिजन परिवाराचे अध्यक्ष अडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना गूनिजन शपथ प्रदान केली आणि गुनिजान संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.हजारो टाळ्यांच्या साक्षीने हा ठराव मंजूर झाला.हा कार्यक्रम शासनाच्या कोरोना दक्षता निवमावली नुसार अत्यंत काटेकोर पणे व शांततेत पार पडला. सोहळ्याच्या समारोपाला तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून उत्साहात समारंभाची सांगता केली.