Home Breaking News १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

1328

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील संशयित आरोपी आणि यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून दोन्ही संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.

Previous article73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम
Next articleघराचे रस्त्यासाठी आमरण उपोषण