मराठी विभागाचा पुढाकार.
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
गडचिरोली:-आज दिनांक २७ जानेवारी रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील निवडक कवींनी स्वरचित रचलेल्या कवितांना चालना देण्यासाठी मराठी विभागाच्या पुढाकारातून कवि सम्मेलन आयोजित करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील २२ कविंनी कौटुंबिक,सामाजिक, आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक भौगोलिक,कृषी,कला,क्रीडा, प्रेरणादायी,शिक्षण,प्रेम,निसर्ग,भावस्पर्शी,ऐतिहासिक महत्त्व पटवून देणाऱ्या अशा कवितांचे सादरीकरण केले.
ऑनलाइन कविसंमेलनात उत्कृष्ट सूत्रसंचालन मराठी विभागाचे विषय सहाय्यक डॉ.विजय रामटेके,निळकंठ शिंदे यांनी केले तर कविंना प्रोत्साहन अधिव्याख्याता डाॅ. प्रदिप नाकतोडे,मिलिंद अघोर यांनी केले.
ऑनलाइन कविसंमेलनाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली चे प्राचार्य डॉ.विनित मत्ते हे होते. त्यांनी सर्व सहभागी कविंना मार्गदर्शन करून भविष्यात प्रत्येकांनी आपल्या लेखनितून उत्कृष्ट कविता,लेख लिहावे व मराठी भाषा संवर्धन करावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
कवि सम्मेलनचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक,विषय साधनव्यक्ती यांनी घेतला. सोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील विषय सहाय्यक,समुपदेशक हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे व उपस्थित कविंचे आभार श्री प्रभाकर साखरे समुपदेशक यांनी केले.