Home Breaking News मरणानंतरही हाल! निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी (हा)ग्रामपंचायतीसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार

मरणानंतरही हाल! निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी (हा)ग्रामपंचायतीसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार

378

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

गेल्या अनेक वर्षापासून अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही. वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर अत्यंस्कार केले.
निलंगा तालूक्यातील हाणमंतवाडी येथील सोजरबाई रामचंद्र निकम (वय ७०) यांचा बुधवारी मृत्यू झाला. हणमंतवाडी हे गाव चार हजार लोकवस्तीचे असून अध्याप गावात स्मशानभूमी नाही. गेल्या विस वर्षापासून हणमंतवाडी येथील गावकरी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करत आहेत. परंतू जागेचा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याने प्रेताची अव्हेलना होत आहे. त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न कायमच निर्माण होत असतो. परंतु शासन गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करत नसल्याने गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी गावाच्या भर चौकातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करावा लागला आहे.

Previous articleडाएट गडचिरोलीच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त कवी संमेलन संपन्न.
Next articleटिटवी ते नांद्रा रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण ठार