शेगाव: शेगाव परिसरात मागील तीन चार दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने या थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.”आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला”असे एक प्रसिद्ध मराठी गीत आहे या गीताची आठवण करून देणारा हा थंडीचा महिना विविध आजारांना निमंत्रण देताना दिसत आहे. भागिले तीन चार दिवसापासून शेगाव शहर व परिसरात थंडीचा जोर वाढल्याने लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक थंडीपासून बचाव व्हावा याकरिता विविध उपाययोजना करताना दिसत आहेत नागरिकही थंडीमुळे घराबाहेर उशिरा निघत आहेत. त्यामुळे सकाळी ग्राहकांची वाट पाहत दुकाने उघडून बसलेले दुकानदार थंडीपासून बचाव करिता दुकानासमोरच शेकोटी पेटवून आंग शेकतांना दिसत आहेत. वाढत्या थंडीमुळे शहर व परिसरात सर्दी-खोकला ताप इत्यादी आजाराने पाय पसरलेले दिसत असून घरोघरी या आजाराने ग्रस्त रुग्ण वाढत आहेत एकीकडे सर्दी खोकला ताप याचा प्रभाव वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे ओमॅक्रोन कोरोना महामारी ची भिती सुद्धा नागरिकांमध्ये दिसत आहे त्यामुळे बहुतेक नागरिक दवाखान्यामध्ये जाणे टाळत असून थंडीचा सर्वाधिक जास्त प्रभाव वृद्ध नागरिक विशेषता: ज्यांना दम्याचा विकार आहे असे नागरिक,लहान मुलं नवजात शिशु, यांच्यावर जास्त होताना दिसत आहे. सर्दी खोकला ताप वाढल्याने खाजगी रुग्णालय हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहेत