(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
गुरुवार 27 जानेवारी रोजी घुग्घुस भाजपातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घुग्घुस येथील तिलक नगर, अमराई वार्ड, नवीन वस्ती, बँक ऑफ इंडिया, शांती नगर, शास्त्री नगर, शिवनगर, आंबेडकर नगर, शालिकराम नगर, इंदिरा नगर, बंगाली कॅम्प येथील गरीब जनता अनेक वर्षा पासून नझुलच्या जागेवर स्वतःचे घर बांधून राहत आहे. तसेच काही लोक सरकारी जागेवर घर बांधून राहत आहे तर लोक झूडपी जंगलाच्या जागेवर घर बांधून राहत आहे व लोक वन विभागाच्या जागेवर घर बांधून राहत आहे येथील जनतेला स्थायीपट्टे देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी संजय तिवारी उत्तरभारतीय मोर्चा प्रदेश सचिव,भा ज यू मो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, , माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप मलेश बल्ला अमोल थेरे उपस्थित होते.