( लातूर/निलंगा ) प्रतिनिधी
डी.एस. पिंगळे
माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून अंबुलगा (बुं) येथील जिल्हा परिषद गटातील १९ गावांमध्ये २ कोटी २७ लाख रुपये निधीचे. विकासकामे तसेच भूमीपूजन करण्यात आले असून तातडीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अंबुलगा (बुं) येथील जिल्हा परिषद शाळेतील २८ लाख रु. सांस्कृतिक सभागृह आणि १४ लाख रु. शाळांच्या दुरुस्तीसाठी. ८ लाख रु. शाळेच्या एका खोलीच्या बांधकामासाठी एकूण ५० लाख. रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केदारपूर ते काटेजवळगा आणि केदारपूर येथील हनुमान पाटी पर्यंत ४० लाख रु. निधी. केदारपूर येथे दोन किलोमीटरचा रस्ता आणि जिल्हा परिषद शाळेच्या दोन नवीन खोल्या १४. लाख. रु खर्चून बांधण्यात येणार आहेत. जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठ्यासाठी १५ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिल्या.
काटेजवळगा येथील मुस्लिम स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीसाठी ४ लाख रु. अंबुलगा जिल्हा परिषद गटाकडून १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
तळीखेड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी १७ लाख. रुपये. तसेच नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी १० लाख रुपये निधी. आणि
दलित वस्तीमध्ये समाज मंदिर साठी ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्या आहे.
जाजनूर ते आंबुलगा (बु.) रस्त्यांसाठी ४० लाख रु. आणि आंबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातून पाण्याचा टाकीसाठी १० लाख रूपये निधी मंजूर केला आहे. या गावातील विकासकामांना भर पडली आहे.