Home Breaking News जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी! आर्वी अवैध गर्भपात प्रकरण

जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी! आर्वी अवैध गर्भपात प्रकरण

907

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

वर्धा : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. कदम दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी 31 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आर्वी येथील अल्पवयीन गर्भपात प्रकरणाच्या चौकशीत 11 मानवी कवट्या आणि 54 हाडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. याशिवाय डॉ. नीरज कदमच्या घरीकाळवीटाची कातडी सापडली. त्यानंतरही त्यांच्या घरातून 97 लाख रुपयांची रोख रक्‍कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली.

या घटनाक्रमात अनेक खळबळजनक खुलासे पुढे आले. मागील तीन ते चार दशकांपासून कदम रुग्णालयात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा सरू असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यादिशेनेही पोलिस यंत्रणा तपास करणार आहे. दुसरीकडे वन विभाग डॉ. नीरज कदम यांना ताब्यात घेण्याची शक्‍यता आहे. काळवीटाच्या कातडीचा नमुना सध्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर वनविभागाकडून डॉ. नीरज कदम यांना अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Previous articleअंबुलगा (बुं.) जिल्हा परिषदेच्या गटातील १९ गावांच्या विकासाला चालना दिली. माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर
Next articleभर दिवसा धूर्यावरून दुचाकी लंपास