Home चंद्रपूर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना

258

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 30 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता घुग्घुस येथील मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बबनराव बोढे यांच्या मार्गदर्शनात वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी घुग्घुस परिसरातील नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात परिसरातील गोरगरीब गरजू रुग्णांची सेवा करने सुरु आहे. सातवी तुकडी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामच्या नेत्ररुग्णालयात पाठविण्यात येत आहे. घुग्घुस व पोंभुर्णा येथे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत होते परंतु दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे गर्दी करता येत नसल्याने महाआरोग्य शिबीर थांबले. तरी सुद्धा गोरगरिब जनतेची आरोग्य विषयक सेवा करण्याचे कार्य निरंतर चालू आहे. त्याअनुषंगाने परिसरातील गोर गरीब गरजू लोकांना आरोग्याची सुविधा मोफत देत आहोत. भविष्यात गोर गरीब गरजू लोकांना आरोग्याच्या संदर्भात अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली आहे. केंद्राचे संचालक श्री. विवेक बोढे यांच्या नेतृत्वात गोर गरिबांची सेवा अविरत पणे सुरु आहे.
घुग्घुस परिसरातील अमराई वार्ड, बँक ऑफ इंडिया, इंदिरा नगर, आंबेडकर नगर, शांती नगर, विद्या टॉकीज, शास्त्रीनगर, श्रीराम वार्ड, साखरा व शेणगाव येथील 20 रुग्णांना मोती बिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज पाठविण्यात आले.
यावेळी भाजपाचे धनराज पारखी, श्रीनिवास कोत्तूर, सुशील डांगे व अजय लेंडे उपस्थित होते.

Previous articleजळगाव जिल्हाता १०१गावां माध्ये तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतची अटल भूजल योजनेत निवड
Next articleवाईन सोबतच शेतकऱ्यांना गांज्याची शेती करण्यास परवानगी द्या