करनी सेनेची मूख्यमंत्र्याकडे मागणी
संग्रामपूरः- राज्य सरकारने माॅल, किराणा दुकानावर वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याच प्रकारे शेतकऱ्यांना गांजा, अफू तसेच मोहाची शेती करण्यास परवानगी देण्याची मागणी करनी सेनेतर्फे संग्रामपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी राजपूत करनी सेनेचे विदर्भ अध्यक्ष सागर उर्फ दादा ठाकूर यांनी निवेदन देऊन केली. संग्रामपूर तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत न केल्याने जगाला पोसणाऱ्या जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशी पोटी झोपण्याची वेळ आली आहे. निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची गरज असतांना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निसर्गाचा संकटाचा झेलण्याय्रा बळीराजाला सूल्तानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी राज्य सरकारने वाईन सोबत गांजा अफू तसेच मोहाची शेतीच्या परवानगी सह हातभट्टीची दारू पाडण्याची परवानगी देण्याची मागणी राजपूत करनी सेनेच्या विदर्भ युवा अध्यक्ष सागर उर्फ दादा ठाकूर यांनी मूख्यमंत्र्याकडे केली आहे.