Home Breaking News नायगाव येथील पंतप्रधान आवास योजना ( ड यादी )यात पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात...

नायगाव येथील पंतप्रधान आवास योजना ( ड यादी )यात पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात येवुन अपात्र लाभार्थ्यांची घरकुल मंजुर ग्रामस्थांची बिडीओकडे तक्रार

981

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेची ड यादीत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून त्यांना तात्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे. तसेच अपात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम पंचामतच्यावतीने दि. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतु, दि. २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली आहेत. ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आले आहे. त्यांची घरकुल मंजूर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा, अपंग आणि बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी, विनोद बाबु तडवी, लुकमान महारू तडवी, सुभान इमाम तडवी, छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी, रशीद निजाम तडवी, फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Previous articleआमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी,IAS नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Next articleनेहरू युवा केंद्राच्या वतीने…शेगावात युवक – युवती सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळा