शेगाव : युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नेहरू युवा केंद्राची भूमिका फार महत्वाची असून युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहरू युवा केंद्राची वाटचाल आहे त्यामुळे युवक युवतींनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र मध्यम करावे असावे असे मत तहसीलदार समाधान सोनवणे यांनी १ फेब्रुवारी रोजी केले आहे.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित सकारात्मक जीवनशैली व युवक युवती सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पंपंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. दिपप्रज्वलन व गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार समाधान सोनवणे तर परिविक्षाधीन तहसीलदार पवन पाटिल, विस्तार अधिकारी संदिप दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश चिंचोलकर, नानाराव इंगळे, युवा विकास केंद्र अध्यक्ष लक्ष्मणराव गवई, शीला मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समितीत ग्रामीण भागाचे कामकाज कशाप्रकारे चालते याचे अवलोकन उपस्थितांनी प्रत्यक्ष केले त्यानंतर सखोल मार्गदर्शन विस्तार अधिकारी संदिप दळवी यांनी केले त्यानंतर कोरोना विषयावर जनजागृती आपल्या मनोगतातून डॉ.प्रकाश चिंचोलकर यांनी केली. तर शीला मोहोड व नानाराव इंगळे यांनी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून महिलांसाठी असलेल्या योजनां सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कोमल बेडेकर, द्वितीय अंकिता झाडोकार व तृतीय गीतांजली शास्त्री यांनी पटकवल्याबद्दल त्यांना तहसीलदार समाधान सोनावणे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सुरज बोरसे, निशा हागे, शिवाजी हावरे, सुमित वाकोडे, दर्शन गवई मातृशक्ती संघटनेच्या वैशाली तायडे, मुक्ता ठाकूर, वर्षा भोंडेकर, नारीशक्तीच्या निता पाटिल, रिपाई गटाच्या राजकन्या रेवसकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोंडेकर यांच्यासह युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावित लक्ष्मणराव गवई तर संचालन पत्रकार अमर बोरसे यांनी व आभार स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी मानले.
# नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तहसीलदार समाधान सोनवणे, पवन पाटिल, विस्तार अधिकारी संदिप दळवी यांच्याहस्ते देण्यात आले.