Home लातूर पंचायत समिती देवणी येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामास मंजुरी

पंचायत समिती देवणी येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामास मंजुरी

216

 

(लातुर/निलंगा)प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

देवणी येथे पंचायत समितीची नुतन व सुसज्‍ज इमारत तयार झालेली आहे. मात्र पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्‍थान नसल्‍याने त्‍यांची गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात येताच आमदार श्री.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांनी देवणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्‍या निवासस्‍थानासाठी प्रशासकीय मान्‍यता द्यावी व निधी उपलब्‍ध करून दयावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री ना.श्री.हसन मुश्रीफ यांच्‍याकडे पत्राद्वारे केली.
एवढ्या वरच न थांबता संभाजीभैय्यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कार्यासाठी १३ कोटी ३ लाख रूपयांच्या निधीसह प्रशासकीय मान्‍यता मिळवली. त्यामुळे देवणी पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आता एकुण २६ निवासस्‍थाने या निधीच्‍या माध्‍यमातून उभारली जाणार आहेत.अशी माहिती देण्यात आली.

Previous articleजिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,जिल्हा शिक्षण विभाग बैठक अमरावती कैवल्य एजूकेशन फाँडेशन बैठक
Next articleपुष्पा सिनेमा स्टाईलने चंदन तस्करी करण्याचा डाव फसला सुलतानपूर ते बोरखेडी रस्त्यावर चंदनाची तस्करी करताना