अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक
कारंजा (घा ) /प्रतिनिधी :इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली .तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये वर्धा जिल्ह्यातील वर्ग 10 व वर्ग 12 हे कोरोना संसर्गजन्य आजारामुळे मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन भरविण्यात आले आहे .सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले .ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या पालकांची इच्छा पाहता वर्ग 10 व 12 वी ची परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोना विषयक भीती दूर होईल कोरोना चा प्रादुर्भाव कमी करता येईल .या बाबी लक्षात घेता परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली .यावेळी सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर , राणा सिंग बावरी ,संकेत बानाइतकर ,प्रज्वल कडू ,रिपल डोंगरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.